नाशिक। दि. ३० जानेवारी २०२६: अंबड औद्योगिक वसाहत अन् सातपूरला जोडणाऱ्या गरवारे टी पॉइंट ते एक्स्लो पॉइंट या तीन किलोमीटर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती.
अखेर या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू होत असून, ३० जानेवारी ते २९ एप्रिल असे तीन महिने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना वाहतूक पोलिस शाखेने काढली आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एक्स्लो पॉइंटसाठी मार्ग असा:
गरवारे टी पॉइंटकडून एक्स्लो पॉइंटकडे जाणारी वाहने दुभाजकाच्च्या उजवे (विरुद्ध) बाजूच्या मार्गावरून गरवारे टी पॉइंट क्रॉम्प्टन कंपनी, ब्लू क्रॉस कंपनी, ग्लॅक्सो कंपनी टी पॉइंट सिमेन्स कंपनी पॉवर हाउस टी पॉइंट, आरपी स्विट टी पॉइंट, नाशिक क्लस्टर कंपनी येथून दुभाजकाचे डावे बाजूने -एक्स्लो पॉइंटमार्गे पपया नर्सरी व इतरत्र वळविण्यात आली आहे.
गरवारेकडे जाणारा मार्ग असा:
एक्स्लो पॉइंटकडून गरवारेकडे येणारी वाहने ही एक्स्लो पॉइंट येथून डावीकडे वळून प्रणव स्टॅपिंग टी पॉइंट टेक्नोफोर्स कंपनी उजव्या बाजूला वळण घेऊन अजिंठा हॉटेलसमोरून आकाश उद्योग टी पॉइंट, सेंट्रल वेअर हाउस, संजीवनी बॉटनिकल टी पॉइंट, डेल्टा कंपनी, जेमिनी इन्फोटेक, सरळ टाल्को इंडिया कंपनी, हॉटेल वेलकम तेथून एनएच-३ हायवे सर्व्हिस रोडवर येतील. तेथून उजवीकडे वळण घेत वाहने गरवारे टी पॉइंट येथून हायवेने मुंबईकडे जातील.
![]()


