नाशिक। दि. २५ जानेवारी २०२६: मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 16 वा राष्ट्रीय मतदार दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यावर्षी नाशिक जिल्ह्यात साजरा होत आहे.
यानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तथा प्रधान सचिव एस. चोकलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली रविवार 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मुधमती सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या 16 वा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सभागृहाबाहेरील कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे सकाळी 6.30 वाजता सायकल रॅली, तर सकाळी 10.30 ते 10.55 वाजेपर्यंत चित्ररथ, पथनाट्य, सेल्फी पॉइंट, मतदार जागृती दालनास भेट आदी कार्यक्रम होतील.
त्यांनतर सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, निवडणूक स्वच्छतादूत किरण भालेराव, मानवता किन्नर समाज संस्थेच्या अध्यक्ष सलमा गुरू, व्याख्याते तुषार पगारे, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या जिल्हा समन्वयक आसावरी देशपांडे, के.टी.एच.एम महाविद्यालयातील प्रा. गणेश रोडे, दिव्यांग कल्याण संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा आदी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात श्री. पगारे व श्री. रोडे यांचे व्याख्यान होईल. तसेच पुस्तक प्रकाशन, राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेतली जाईल.
![]()


