नाशिक: तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी

नाशिक। दि. १४ जानेवारी २०२६: तपोवनात साधुग्राम आणि प्रदर्शनी केंद्र (माईस हब) उभारण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड, पुनर्रोपण याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी (दि.१४) सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने झाडे तोडण्यास स्थगिती देण्यास नकार देत राज्य सरकारसह महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस जारी करत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. तसेच सुनावणी १४ जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली. यामुळे आता बुधवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

प्रस्तावित वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली होती. यामुळे उच्च न्यायालयानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय हरित लवादाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790