नाशिक। दि. ८ जानेवारी २०२६: पेठरोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार मुलगाही जखमी झाला आहे.
सुमित्रा मारोती पंचांगे (वय:४५, प्रणव अपार्टमेंट, धर्माजी कॉलनी, सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या बुधवारी सकाळी सातपूर येथून मुलासोबत दुचाकीवरून आडगाव येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडे जात होत्या. पेठरोडवरून प्रवास सुरू असताना मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत सुमित्रा पंचांगे रस्त्यावर कोसळल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दुचाकी चालवत असलेला मुलगा सर्जेराव पंचांगे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
![]()


