शनिवारी पदभार; डिसेंबर २०२७ पर्यंत असेल कार्यकाळ
मुंबई। दि. १ जानेवारी २०२६: महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या सर्वोच्च पदी अपेक्षेप्रमाणे १९९० च्या बॅचचे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.
विद्यमान अधिकृत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३ जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्याच दिवशी दाते पदाची सूत्रे हाती घेतील. सदानंद दाते यांची केंद्रातून महाराष्ट्र केडरमध्ये घरवापसी झाली. त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘प्रकाश सिंह’ निकालानुसार नव्या महासंचालकांना दोन वर्षांचा निश्चित कार्यकाळ मिळणे अनिवार्य आहे.
दाते यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२७ पर्यंत असेल. २००८ च्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयात अतिरेकी कसाब, इस्माईलचा सामना केला होता. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकाने सन्मानित केले होते.
![]()


