
नाशिक। दि. २२ डिसेंबर २०२५: त्र्यंबकेश्वर येथील अवघ्या ९ वर्षांच्या बालकावर अपोलो हॉस्पिटल्स नाशिकमध्ये VSD (Ventricular Septal Defect) क्लोजर ही हृदयातील अत्यंत जटिल पण महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. अझहर सय्यद, कन्सल्टंट कार्डियाक सर्जन तसेच डॉ. भूषण टिळे, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट व भूलतज्ञ
डॉ. भूपेश पराते यांनी केले तसेच डॉ. अभयसिंग वालीया, सिनिअर कार्डियाक सर्जन व हृदयरोग तज्ञ डॉ. निर्मल कोलते बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र कुलकर्णी व डॉ सागर भालेराव यांचे सहकार्य लाभले.
बालकाला गेल्या काही काळापासून सतत दम लागणे, शारीरिक वाढ कमी जाणवणे यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागत होता. प्राथमिक तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, त्र्यंबकेश्वर येथे झाली. तेथे बालकाच्या जन्मजात हृदयरोगाची शक्यता व्यक्त करण्यात आली.
अपोलो हॉस्पिटल्सच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हेल्थ कॅम्पमध्ये केलेल्या सखोल तपासणीमध्ये बालकाला जन्मजात हृदयविकार – हृदयात छिद्र (VSD) असल्याचे निदान झाले. हा त्रासच मुलाच्या प्रकृती बिघडण्यामागील मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले.
पालकांशी सर्व माहिती व उपचार प्रक्रियेची सविस्तर चर्चा करून VSD क्लोजर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला पारंगत सर्जन व बालरोगतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया यशस्वी झाली सोबतच बालकांकरिता विशेष पोस्ट ऑपरेटिव केअरला बालकाने उत्तम प्रतिसाद देत तिसऱ्या दिवशीच डिस्चार्ज मिळवला.
ही संपूर्ण शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच CSR उपक्रमांच्या मदतीने पूर्णपणे मोफत करण्यात आली रुग्णाच्या कुटुंबियांनी भावूक होत सांगितले, “अपोलो मधील अनुभवी आणि कुशल डॉक्टर , उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज इन्फ्रास्टक्चर तसेच कुशल नर्सिंग स्टाफ या सगळ्यांमुळे आमच्या बाळाला नवे निरोगी आयुष्य मिळाले आहे आम्ही संपूर्ण अपोलो टीमचे मनःपूर्वक आभार मानतो !
अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर दिप्तेन्दू पांडा यांनी संपूर्ण हृदयरोग विभागाचे टीमचे अभिनंदन करताना सांगितले की, “एका लहानग्याच्या चेहऱ्यावर पुन्हा निरोगी हसू आणणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. समाजाच्या आरोग्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स कटिबद्ध आहे. अशा उपक्रमांचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, तसेच बालकांतील जन्मजात हृदयविकार व संबंधित उपचाराकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
![]()

