🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: अमरधामजवळ मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघेजण गंभीर

नाशिक, दि. ११ डिसेंबर २०२५: पंचवटी परिसरातील अमरधामजवळ बुधवारी पहाटे २ ते ३ च्या सुमारास झालेल्या गंभीर अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०१ बीयू ३११२ क्रमांकाची होंडा सिटी कार तपोवनकडून पंचवटीकडे जात असताना चालकाचा ताबा सुटला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळले आणि अपघात झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोड प्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी, मनपाने लेखी हमी देण्याची मागणी

या धडकेत सुरज संजय यादव (२१) याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर तिघेजण गंभीर जखमी असून बचाव पथकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. धडक इतकी तीव्र होती की कारचे एअरबॅग्स उघडले, तसेच सीएनजी टँक मागील सीटवर सरकून पडला. तर वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज (दि. ३१) शहरातील 'या' वाहतूक मार्गात बदल

प्रत्यक्षदर्शींनी कार अतिवेगाने जात असल्याचा दावा केला आहे. अपघातानंतर काही काळ कारमधून सीएनजी गॅसची गळती सुरू होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790