नाशिक। दि. २१ नोव्हेंबर २०२५: येथील बसस्थानकात बसचे प्रेशर ब्रेक नादुरुस्त होऊन बस थेट फलाटावर चढल्याने बुधवारी (दि.१९) झालेल्या अपघातात आदर्श योगेश बोराडे या नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
याप्रकरणी मयत मुलाच्या आजोबांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने आगारप्रमुख हेमंत नेरकर यांच्यासह चालक, कार्यशाळा प्रमुख, पाळीप्रमुख व वाहनांची देखभाल करणारा कर्मचारी या पाच जणांविरोधात सिन्नर पोलिसांतगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच याप्रकरणी चौकशी अहवाल समोर आल्यानंतर तीन कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर भालेराव यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालक ज्ञानेश्वर चंदू बनगय्या, आगारप्रमुख हेमंत नेरकर, कार्यशाळा प्रमुख दिगंबर पुरी, पाळीप्रमुख रईस व वाहनांचा देखभाल करणारा कर्मचारी अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
![]()
