नाशिक। दि. १३ नोव्हेंबर २०२५: अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या नऊ वर्षापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीस गुन्हे शाखा दोनच्या पथकाने चाळीसगाव येथून ताब्यात घेतले. समाधान काळे असे पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अंबड पोलिस ठाण्यात १८ एप्रिल २०१७ रोजी पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये संशयित समाधान सापडत नसल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
पोलिस हवालदार मनोहर शिंदे, महेश खांडबहाले यांना अंबड पोलिस फरार समाधान सध्या चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे असल्याची माहिती मिळाली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना माहिती देऊन मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, महेश खांडबहाले, सुनील खैरनार अशांना चाळीसगाव येथे रवाना करण्यात आले. पथकाने माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना समाधान यास चाहूल लागताच तो पळून जात असताना पथकाने त्याचा पाठलाग करून पकडले.
![]()


