नाशिक: सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून महिलेची बदनामी; सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

नाशिक। दि. ६ नोव्हेंबर २०२५: पीडिता विवाहेच्छूक असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर फोटोसहित प्रसारित करून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे वैयक्तिक फोटो नवनाथनगर, पेठरोड भागातील एका महिलेने कुठून तरी मिळवून त्यांच्या फोटोवर चुकीचे नाव टाकले आणि फिर्यादी या विवाहेच्छूक असल्याची खोटी माहिती देऊन ती सोशल मीडिया पेजवर फिर्यादीच्या परवानगीशिवाय टाकली. यामुळे पीडितेची बदनामी झाली. या प्रकाराने व्यथित होईन पीडित महिलेने सायबर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790