
नाशिक। दि. ३० ऑक्टोबर २०२५: दोन वर्षापूर्वी नाशिकरोड टपाल कार्यालयात नोकरी लावून देतो, असे सांगून आठ लाख रुपये उकळून बनावट नियुक्तीपत्र देत फरार झालेला आरोपी देवानंद धोंडुजी गायकवाड (३२, रा. मंगरूळपीर, जि. वाशिम) यास गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अखेर शिताफीने अटक केली आहे.
या गुन्ह्यात फरार गायकवाड यास वाशिम जिल्ह्यात शोध पथकाने शिताफीने अटक केली. २८ डिसेंबर २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गायकवाड याने फिर्यादी यांच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते.
त्याने व साथीदारांनी संगनमताने त्यांच्याकडून आठ लाख रुपये उकळले होते. नाशिकरोडच्या टपाल कार्यालयात कुठल्याही प्रकारची नोकरी दिली नाही आणि बनावट नियुक्तिपत्र देत पैसे उकळले असे लक्षात येताच फसवणूक प्रकरणी त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
![]()

