
नाशिक। दि. २९ ऑक्टोबर २०२५: जिल्हा रूग्णालयातील बाह्य रूग्ण विभागात हिमालय बेबी केअर या कंपनीच्या सौजन्याने स्तनदा मातांसाठी अद्ययावत हिरकणी कक्षाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या हस्ते आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गोरे, हिमालय बेबी केअरचे सी.एस.आर व्यवस्थापक राकेश रामटेके यांच्यासह बाह्यरूग्ण विभागातील परिसेविका, कर्मचारी, रूग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे यांनी हिरकणी कक्षाची माहिती दिली. हिरकणी कक्ष बाह्यरूग्ण विभागात असल्यामुळे स्तनदा मातांना त्याचा उपयोग होणार आहे असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ. शिंदे यांच्या हस्ते उपस्थित स्तनदा मातांना व त्यांच्या बालकांना आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. यावेळी डॉ. गोरे यांनी स्तनपानाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा रूग्णालय, नाशिक येथे एक हिरकणी कक्ष पूर्वीपासून कार्यरत होता मात्र वाढत्या रूग्ण संख्येमुळे स्थापित नवीन अद्ययावत हिरकणी कक्ष कार्यान्वित केला आहे. येथे विविध सेवा सुविधांचा लाभ स्तनदा मातांना होणार आहे.
![]()


