
नाशिक। दि. २७ ऑक्टोबर २०२५: पेठरोड, अश्वमेधनगररोडवर कामगाराकडे पैशांची मागणी करून नकार दिल्यावर जबर मारहाण करत मोबाइल आणि रोकड लुटून नेल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत पांडवलेणी येथील एका हॉटेलजवळ या दोघा लुटारूंना ताब्यात घेतले. उमेश खनपटे, सूरज पवार (दोघे रा. अश्वमेधनगर) अशी या संशयितांची नावे आहेत.
🔎 हे वाचलं का?: नाशिक: विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरावेत
सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाचे महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीनुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. युनिट २ च्या कार्यालयात नेऊन चौकशी केली असता पेठरोड येथे जबरी लूट केल्याची त्यांनी कबुली दिली.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


