
नाशिक। दि. २६ ऑक्टोबर २०२५: जालना येथील विकास लोंढे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे ही कारवाई केली. विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड (रा. जालना) असे या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री खून केल्यानंतर तो रेल्वेने नाशिकमध्ये आला होता.
जालना येथील विकास लोंढे याचा २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ वाजता नवीन वसाहत येथे जुन्या वादातून खून झाला होता. घटनेनंतर संशयित रेल्वेने पळाल्याची माहिती मिळाली. तो नाशिकरोडला उतरणार असल्याची माहिती प्रशांत मरकड यांना मिळाली होती. पथकाने फोटोच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशी घोषणाही त्याच्याकडून करवून घेतली.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, देविदास ठाकरे, विशाल काठे, सुकाम पवार, अंमलदार जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे, विशाल साबळे यांनी केलेली आहे.
![]()

