नाशिक: पोलीस स्मृतिदिन; शहीद पोलीस बांधवांना दिली मानवंदना

नाशिक। दि. २२ ऑक्टोबर २०२५: ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…’ हे ब्रीद घेऊन कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या शहीद वीर पोलिस बांधवांना मंगळवारी (दि. २१) शहर आणि ग्रामीण पोलिस दलाकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कारच्या धडकेत महिला ठार

सालाबादप्रमाणे यंदाही २१ ऑक्टोबरला पोलीस स्मृतिदिन पाळण्यात आला. या स्मृतिदिनानिमित्त शहिदांच्या स्मृतींना अभिवादनासाठी शरणपूर रोडवरील पोलिस कवायत मैदानातील हुतात्मा स्मारकावर पोलिसांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सरकारी अधिकारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाचा दीड तोळ्याचा सोन्याचा गोफ लांबवला

यावेळी स्मारकावर झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच मैदानात पोलिस बॅण्ड पथकाने सादर केलेल्या विशिष्ट धूनवर सशस्त्र संचलन पार पडले. यानंतर हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिसांकडून शहिदांना मानवंदना देण्यात आली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790