नाशिक: उज्जैनच्या शिष्टमंडळाने घेतली कुंभमेळा नियोजनाची माहिती !

नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२५: उज्जैन (मध्य प्रदेश) येथे २०२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय शिष्टमंडळाने आज नाशिक येथे येत कुंभमेळ्याच्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच त्यांनी सुरू केलेल्या तयारीची माहिती दिली.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे २०२८ मध्ये कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी मध्य प्रदेशचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय दुबे, उज्जैनचे विभागीय आयुक्त आाशिष सिंह, उज्जैनचे जिल्हाधिकारी रोशनकुमार सिंह, उज्जैन महानगरपालिकेचे आयुक्त अभिलाष मिश्रा यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा नियोजनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

विभागीय आयुक्त कार्यालयात ही भेट झाली. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर आदी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कुंभमेळा आयोजनासंदर्भात गठित करण्यात आलेल्या मंत्री समिती व कुंभमेळा प्राधिकरणाच्या रचनेबरोबरच नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. त्यात रस्ते, घाटांचा विस्तार, मल नि:स्सारण प्रकल्प, रामकाल पथ, त्र्यंबकेश्वर उपसा सिंचन योजना, वाहनतळ, रेल्वे, विमान, रस्ते वाहतुकीची सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालये, साधूग्राम, सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त, गर्दी नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. याबरोबरच उज्जैनच्या शिष्टमंडळातर्फे अपर मुख्य सचिव श्री. दुबे, जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी कुंभमेळा नियोजनाची सविस्तर माहिती देत उज्जैन येथे भेट देण्याचे निमंत्रण आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर या पथकाने तपोवन, मल नि:स्सारण प्रकल्प, रामकुंड परिसरास भेट देऊन पाहणी केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here