नाशिक: भीषण अपघात; ट्रकने दिलेल्या धडकेत ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नाशिक। दि. ११ ऑक्टोबर २०२५: सातपूर परिसरातील पाईपलाईन रोडच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात आठ वर्षाच्या चिमुकलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तर घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

याबाबत अधिक माहिती अशी की, नेविका अभिषेक नेरकर (वय ८, रा. मयूर स्वीटच्या पाठीमगे, आनंदवल्ली, पाईपलाईन रोड सातपूर) असे मयत मुलीचे नाव आहे. नेविका ही आपल्या आजीसोबत दुचाकी क्रमांक (टीव्हीएस ज्युपिटर, क्रमांक एमएच १५ जेई ९१८१ ) वरून घराकडे जात होती. त्यावेळी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच १७ बी.डी ५०५ याने दुचाकीला जोरात कट मारला. त्यामुळे तोल जाऊन दुचाकीवरून नेविका खाली पडली आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी बस नियोजनात उद्यापासून (दि. ११) महत्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर...

दरम्यान, या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी केली. तसेच घटनेनंतर पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790