
नाशिक। दि. ०५ ऑक्टोबर २०२५: पळसे, फुलेनगर व चेहेडी पंपिंग भागात घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास नाशिक रोड पोलिसांनी पकडून चोरलेल्या दोन्ही सोन्याच्या चैन जप्त करण्यात आल्या आहेत.
चेहेडी पंपिंग येथील विश्वेश्वराय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्नेहा किशोर पाटेकर यांच्या घरी चोरट्याने सोन्याची एक तोळ्याची एक लाख वीस हजार रुपये किमतीची चेन चोरून नेली होती. त्यानंतर पळसे फुले नगर येथील शीतल रेसिडेन्सीमध्ये सुप्रिया रावसाहेब विघे यांच्याही घराही चोरी केली होती.
गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना सिन्नरफाटा येथील सिटी लिंक बस डेपोजवळ संशयित सागर गरड हा संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केला असता त्याने पाटेकर व विघे यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली.
![]()


