नाशिक। दि. २७ सप्टेंबर २०२५: शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत नाशिक विभागातील विविध क्रीडा प्रकाराचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडु, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कारार्थी, युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक, खेळाडुंचे पालक, संघटनांचे प्रतिनिधी, शारिरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा शिक्षक, पालक यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली 29 सप्टेंबर, 2025 रोजी गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे सकाळी 9.00 वाजता ‘युवा व क्रीडा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या संवाद कार्यक्रमाध्ये नंदूरबार, धुळे, जळगांव व नाशिक या जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त विजेते, प्रशिक्षक, शारिरिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, पालक, क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, क्रीडा संघटना व क्रीडा विभागातील सर्व अधिकारी, क्रीडा प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790