नाशिक: रविवार कारंजावरील ४० अतिक्रमणे हटविली

नाशिक। दि. २४ सप्टेंबर २०२५: रविवार कारंजासह बोहरपट्टी ते फूलबाजार, तसेच दहीपूल ते मेनरोड, शालिमारपर्यंत तब्बल ४० ठिकाणी हातगाडीचालक, शेडसवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली.

मंगळवारी (दि. २३) महापालिकेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने कारवाई सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे व उपयुक्त संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानदारांसह, हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली. पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, जावेद शेख, सुनील कदम, जगन्नाथ हमरे आदींनी कारवाई केली.

Loading

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790