नाशिक: गंभीर गुन्ह्यातील आरोपीला खंडणी विरोधी पथकाकडून अटक !

नाशिक। दि. २३ सप्टेंबर २०२५: अंबड पोलीस स्टेशन येथील दाखल गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीला नाशिक शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सुचना दिल्या आहेत. पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पथकातील पोलीस नाईक भुषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारूदत्त निकम यांना गंभीर गुन्हयातील पाहीजे आरोपी सागर सोनार हा नाशिकमध्ये येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. २२ सप्टेंबर रोजी ११.३० वा. वक्रतुंड हॉस्पीटल, पाथर्डी फाटा या ठिकाणी सापळा लावुन पाहीजे आरोपी संशयित सागर हेमंत सोनार (वय २१ वर्षे, रा. सेंन्ट्रल बँक समोर, साळुंके चौक, शिवाजी नगर, जळगाव) यास ताब्यात घेतले. सदर आरोपीता अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर अंबड पो.स्टे.गु.र.नं. ५२७/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असुन तो गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. संशयित आरोपीस पुढिल कारवाईकामी अंबड पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत व सविता कदम यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790