🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

नाशिक। दि. १६ सप्टेंबर २०२५: चोरी, घरफोडी आणि हाणामारीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला अटक करण्यात आली आहे. खंडणीविरोधी पथकाने चामरलेणी, बोरगड येथे ही कारवाई केली. सूरज उर्फ चाऱ्या निवृत्ती चारोस्कर (रा. चाणक्यपुरी, म्हसरुळ) असे या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या पथकाचे दत्तात्रय चकोर यांना सराईत चामरलेणी येथे आल्याची माहिती मिळाली. पथकाचे दिलीप सगळे, दिलीप भोई यांनी पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्याविरोधात म्हसरुळ व दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भुषण सोनवणे, अंमलदार चारूदत्त निकम, भरत राऊत व सविता कदम यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790