
नाशिक। दि. ६ जून २०२५: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या कारवाईत रेकॉर्डवरील २८३ गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली, तर दोघांच्या घरातून प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली ७ पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी ही धडक मोहीम राबवली. यात रेकॉर्डवरील १८३ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच, ६३ गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान, विकी जावर आणि अमीर तांबोळी या दोन संशयितांच्या घरातून घातक कोयते आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त, १२१ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे टवाळखोरांवर वचक निर्माण झाल्याचे दिसून आले. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांकडून हमीपत्र घेण्यात आले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790