नाशिक: जाधव बंधु दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीला ठाणे येथुन ठोकल्या बेडया !

नाशिक (प्रतिनिधी): बोधलेनगर जवळील आंबेडकरवाडी येथे १९ मार्च रोजी झालेल्या जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस ठाणे येथून अटक करण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे.

बोधलेनगरच्या मागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्याने दि. १९ मार्च २०२५ रोजी उमेश भगवान जाधव व प्रशांत भगवान जाधव या दोघा भावांचा कोयत्याने वार करत निघृणपणे खुन केला होता. याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयाचा तपास सुरु असतांना एकुण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र एक फरार होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

त्याअनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या दुहेरी खुनाच्या गुन्हयात सहभाग असलेला संशयित आरोपी मंगेश रोकडे सध्या ठाणे येथे आपले अस्तित्व लपवुन वास्तव्य करत आहे. ही माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यासह पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रविण चव्हाण असे पथक तात्काळ ठाणे येथे २९ एप्रिल २०२५ रोजी रवाना झाले.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

ठाणे शहर येथे आरोपीचे नातेवाईक राहत असलेल्या कापुरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील मनोरमा नगर झोपडपट्टीत दिवस-रात्र सापळा रचण्यात आला. त्यानंतर ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गुन्हयातील संशयित आरोपी हा मनोरमा नगर येथील बुध्दविहारचे मोकळे मैदान, ठाणे शहर येथे असल्याचे दिसुन आले. या ठिकाणी पोलीसांनी आपली ओळख लपवुन व पोषाख बदलुन सापळा रचला होता. मात्र मोकळे मैदान असल्याने आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस पथकाने पाठलाग करुन शिताफीने संशयित आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे (वय-३२ वर्षे रा. सिध्दार्थ हॉटेल, आंबेडकरवाडी, नाशिक) याला ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी नाशिक येथे आणण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, भुषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रविण चव्हाण, अशोक आघाव, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here