💥 BREAKING NEWS: नाशिक: त्र्यंबकरोडवर शरणपूर सिग्नलजवळ चालत्या वाहनांवर झाड कोसळले

नाशिक: नंदिनी नदीवरील संरक्षक जाळीची अखेर दुरुस्ती

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा

नाशिक (प्रतिनिधी): पूरस्थितीची माहिती देणारे सेन्सॉर बसविण्यासाठी नंदिनी नदीवरील दोंदे पूलावरील संरक्षक जाळी स्मार्ट सिटी कंपनीकडून तोडण्यात आली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी ही जाळी दुरुस्त करण्यात आली.

नंदिनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा, राडारोडा, चिकन, मटण दुकानांमधील घाण टाकून मोठ्या प्रमाणात नंदिनीचे पर्यायाने गोदावरीचे प्रदूषण केले जात होते. ते रोखण्यासाठी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर प्रभाग २४ मधील दोंदे पूल, गोविंदनगर रस्त्यावरील पूल, बाजीरावनगर, डेटामॅटिक्सजवळील पूल या ठिकाणी महापालिकेने संरक्षक जाळ्या बसविल्या.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरात पावसाचे धुमशान; विविध भागात झाडे कोसळली

यामुळे घाण, कचरा टाकण्यास प्रतिबंध आला असून, प्रदूषणही कमी झाले आहे. दोंदे पुलावर पूरस्थितीची सूचना देणारे सेन्सॉर बसविण्यासाठी स्मार्ट सिटीने काही दिवसांपूर्वी ही जाळीच तोडून टाकली, ती पुन्हा बसविलीच नाही, यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकला जात होता, प्रदूषणही वाढले होते, जीवितहानी होण्याचा धोका वाढला होता. ही जाळी त्वरित दुरुस्त करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महापालिकेला निवेदनाद्वारे शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने २१ एप्रिल रोजी दिला होता. यानंतर सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी महापालिका व स्मार्ट सिटीकडे पाठपुरावा केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यापूर्वी धरणांमधील जास्तीत जास्त गाळ काढावा- मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल

अखेर गुरुवारी, २४ एप्रिल रोजी ही जाळी स्मार्ट सिटीने दुरुस्त केली. यामुळे घाण, कचरा टाकून प्रदूषण होण्यास प्रतिबंध येणार आहे. बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, विनोद पोळ, सुनील सोनकांबळे, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, अशोक पाटील, शैलेश महाजन, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब तिडके, पंढरीनाथ पाटील, सतीश मणिआर, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सचिन राणे, हरिष काळे आदींसह रहिवाशांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

503 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790