नाशिक (प्रतिनिधी): सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने स्वर सावाना या सांस्कृतिक (सांगितिक) कार्यक्रमाचे नववे पुष्प आविष्कार निर्मित स्वर शिल्प ह्या सांगीतिक कार्यक्रमाने शनिवारी (दि. १९ एप्रिल २०२५) गुंफणार आहे. मु.शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, नाशिक या ठिकाणी सायंकाळी ६ वाट हा कार्यक्रम होणार आहे.
रागमुद्रा आणि भावसौंदर्य यांचा सुरेल आविष्कार, विविध रागातील बंदिशी आणि त्यावर आधारित हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण सुप्रसिद्ध गायिका व संगीत अभ्यासक अॅड.इंद्रायणी पटनी तसेच आनंद अत्रे आणि वीणा गोखले हे आपल्या गायनातून सादर करणार आहेत.
अमोल पाळेकर व जितेंद्र सोनवणे हे वाद्यवृंद साथ करतील. साउंड सचिन तिडके यांची असणार आहे. संकल्पना सार्वजनिक वाचनालय नाशिक यांची आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके हे असणार आहेत, कार्यक्रमास प्रमुख अतिथी श्रीमती मंगला माधवराव भणगे आणि सुहास माधवराव भणगे हे उपस्थित राहतील.
तरी कार्यक्रमाला सावाना सभासद आणि संगीत प्रेमी रसिकांनी विनामुल्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य. विकांत जाधव, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सह.सचिव प्रा.सोमनाथ मुठाळ, अर्थ सचिव गिरीश नातू, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, वास्तुसंग्रहालय सचिव अॅड. अभिजित बगदे , सदस्य – सौ.प्रेरणा बेळे, डॉ.धर्माजी बोडके, सास्कृतिक सह सचिव प्रशांत जुन्नरे, मंगेश मालपाठक, अॅड.भानुदास शौचे यांनी केले आहे.यांनी केले आहे.