नाशिक: बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळक्यास अटक !

नाशिक (प्रतिनिधी): बंदुकीचा धाक दाखवून निखिल दर्यानाणी या व्यावसायिकाचे अपहरण करीत खंडणी मागणार्‍या दोन जणांना व त्यांना माहिती पुरवणाऱ्या दोघांना अशा 4 जणांना नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

महंमद अन्वर सय्यद (वय 30, रा. नानावली, नाशिक) व सादिक लतीफ सय्यद (वय 39, रा. लेखानगर, नाशिक) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास काठे गल्ली सिग्नल येथून निखिल दर्यानानी या व्यावसायिकाचे तीन अनोळखी इसमांनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवीत त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

त्यापैकी 15 लाख रुपये दिल्यानंतर त्यांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिले होते. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-1 च्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चार दिवस अहोरात्र परिश्रम घेत तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे त्यांनी आरोपींची नावे निष्पन्न केली. आरोपींच्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या घरी छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरात शोध घेण्यासाठी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे गेले होते.

त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत समजले, की आरोपी नाशिक येथे आले असून, ते विल्होळी भागात आहेत. ही बातमी त्वरित पालखेडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विल्होळी भागात सापळा रचून वरील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 2 लाख 88 हजार रुपये रोख व मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

त्यांची अधिक चौकशी केली असता आरोपींनी सांगितले, की निखिल दर्यानाणी यांच्या भावाच्या दुकानात काम करणारे अल्फरान शेख व अहमद शेख यांनी निखिल दर्यानाणी यांच्याबाबत माहिती पुरविली होती. त्या आधारावर त्यांनी निखिल यांचे अपहरण करून त्यांना जिवंत सोडण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांच्याकडून 15 लाख रुपयांची खंडणी घेतल्याची कबुली दिली.

पोलिसांनी नंतर माहिती पुरविणार्‍या अल्फरान अश्पाक शेख (वय 25, रा. चौक मंडई, भद्रकाली, नाशिक) व अहमद रहिम शेख (वय 25, रा. वडाळा गाव, नाशिक) यांना वडाळा गावातून ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मुंबई नाका पोलिसांच्या हवाली केले.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव पोलीस, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, राम बर्डे, मुक्तार शेख, रोहिदास लिलके, जगेश्वर बोरसे, चालक श्रेणी पोउनि/किरण शिरसाठ, हवालदार सुकाम पवार, समाधान पवार, मनिषा सरोदे यांच्या पथकाने केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here