
नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय, दि. ७ एप्रिल २०२५): महिला व बालकल्याण समिती नाशिक मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. बालकाची ओळख पटवून संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
असा आहे बालकांचा तपशील
कुमार जीतकुमार, वय 17 वर्षे हा बालक 24 जून 2023 रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन, नाशिक यांच्या हद्दीत विनापालक आढळून आला. या बालकास बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये शेल्टर डॉन बॉस्को, नाशिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे. बालकाच्या भविष्याचा विचार करता पालकांनी शेल्टर डॉन बॉस्को, नाशिक संस्थेत 8856977122 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कुमार सॅम जॉली निळे, वय 8 वर्षे हा बालक 13 मार्च 2025 रोजी ओझर पोलस स्टेशन,ता. निफाड, जि. नाशिक यांच्या हद्दीतील मुंबई-आग्रा रोडवरील देवी मंदिराजवळ विनापालक आढळून आला. या बालकास बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये आधाराश्रम, नाशिक संस्थेत दाखल केले आहे. बालिकाच्या भविष्याचा विचार करता कु.सॅमच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक येथे 0253-2580309, 2950309 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
अथवा दोन्ही बालकांच्या पालकांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253- 2236368 या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत बालिकांचा दावा करण्यास कोणी आले नाही, तर संबंधित बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दुसाणे यांनी कळविले आहे.
![]()


