नाशिक: थकीत कर असलेल्या वाहनांचा 16 एप्रिल रोजी होणार जाहीर लिलाव

नाशिक (प्रतिनिधी): प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 26 वाहनांचा 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 14 एप्रिल 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान अधिकारी मालेगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

जाहीर ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी 5 ते 14 एप्रिल 2025 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 50 हजार रूपये रकमेचा RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या 26 वाहनांत 5 बस, 3 मोटार कॅब, 4 डी वॅन व 14 ऑटोरिक्षा या वाहनांचा समावेश असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथील आवारात ही वाहने पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या लिलाव प्रक्रियेत जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अडकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्‍त्यावर पोच देयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. या जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती 5 एप्रिल 2025 पासून www.eauction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here