नाशिक (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त समता पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील व सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी 7 ते 9 एप्रिल 2025 या कालावधीत विषेश मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदारस्तरावर प्रलंबित आहेत अशा अर्जदारांना त्यांनी नोदणी केलेल्या ई-मेलवर सीसीआयव्हीएस – II प्रणालीद्वारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्या अर्जदारांनी केली नसल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांनी कळविण्यात आलेल्या त्रुटी व मूळ कागदपत्रांसह या कालावधीत 7 ते 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहनही संशोधन अधिकारी पाटील यांनी केले आहे.
![]()


