
नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयातील विविध भागांची पाहणी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आयुक्तालयातील गुन्हेशाखा, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, चारित्र्य व पासपोर्ट पडताळणी शाखा, नियंत्रण कक्ष, परदेशी नागरिक नोंदणी शाखा, परवाना शाखा, तांत्रिक विश्लेषण शाखा, आस्थापना व प्रशासन शाखा, डायल ११२, कुंभमेळा सेल आदी शाखांच्या कामकाजाची माहिती दिली. तसचे जलद प्रतिसाद पथकाकडील विविध शस्त्रे, सरंजाम व बुलेटप्रूफ वाहनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आयुक्त संदीप कर्णिक व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सहभागी तरुण-तरुणींशी संवाद साधला.
लोकाभिमुख व कार्यक्षम पोलिस प्रशासनासाठी नागरिकांनादेखील पोलिस प्रशासनाची माहिती असणे आवश्यक असून, आगामी कुंभमेळ्यामध्ये नागरिकांनी व तरुणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या उपक्रमात प्रामुख्याने एमव्हीपी आयएमआरटीचे प्रा. राहुल ठाकरे, प्रा. हर्षल देशमुख, प्रा. राजश्री वडघुले यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते. पुढील उपक्रम ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्त कार्यालयात होणार आहे.
![]()


