नाशिक: पाथर्डी फाट्याजवळ १९ वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डीफाटा येथील दामोदरनगरच्या चौकाच्या पुढे रविवारी (दि.२३) रात्री आठ वाजेच्या सुमारास एका युवकावर पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

या हल्ल्यात प्रीतेश उर्फ रितेश हरिभाऊ लाटे (१९) हा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर पाथर्डीफाटा येथील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चार ते पाच जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून लाटे यास शस्त्राने हल्ला केला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. गुन्हे शोध पथकाकडून संशयित हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट 'मकोका' लावणार; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आदेश
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790