नाशिक जिल्ह्यात 21 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील टपाल विभागात ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी 21 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

या डाक अदालतीचे आयोजन वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक मुख्य डाक घराजवळ, त्र्यंबकरोड, नाशिक येथे करण्यात आले आहे. ग्राहकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले तक्रार अर्ज दोन प्रतीत वरिष्ठ अधीक्षक, नाशिक विभाग, नाशिक मुख्य डाकघर कार्यालयात 15 मार्च 2025 पूर्वी सादर करावेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

या डाक अदालतीत पंजीकृत टपाल, स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर इत्यादींबाबत तसेच नाशिक विभागातील पोस्टल सेवेविषयी असणाऱ्या ज्या तक्रारींचे 6 आठवड्याच्या आत निवारण झालेले नाही व याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींचीही या डाक अदालतीत दखल घेतली जाणार आहे. असेही नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी कळविले आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790