नाशिक (प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अर्जासाठी यापूर्वी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण नाशिकच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर ऑनलाईन भरून ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक, सामाजिक न्याय भवन, बी विंग नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड कार्यालयात 17 मार्च 2025 पर्यंत सादर करावेत. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज करणाऱ्या परंतु अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व ज्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी SENT BACK केलेला असल्यास त्यांनी तत्काळ त्रूटी पूर्तता करून अर्ज 17 मार्च 2025 पर्यंत कार्यालयात जमा करावा असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती बडगुजर यांनी केले आहे.