३.१० लाखांची रक्कम गोठवल्याने दिलासा
नाशिक (प्रतिनिधी): आर्टिफिशिअल स्पोर्ट्स ग्रास मटेरिअलची ऑर्डर देण्याचे सांगत व्यावसायिकाला मुंबई येथील कंपनीच्या नावाने संपर्क साधून ऑर्डरची रक्कम विविध बँकेत भरण्यास सांगून ५ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी महिन्यात अनोळखी नंबर हून फोन आला. बुऱ्हाणी इंटेरियर मुंबई या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे दुकानात विक्री करण्यास लागणारे आर्टिफिशिअल ग्रासची ऑर्डर दिली या आर्डरचे पैसे देण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. संशयिताने खात्यात यूपीआय आयडीवर वेळोवेळी ५ लाख १९ हजारांची रक्कम भरण्यास भाग पाडून फसवणूक केली.
दिलेली ऑर्डर न आल्याने फसवणूक झाल्याचे समजताच सायबर पोलिसांत धाव घेतली. पथकाने ज्या बँकेत व्यवहार झाले आहे. त्या बँकेशी संपर्क साधला बँकेला फसवणुकीची कल्पना दिली. बँकेत तत्काळ पुढील व्यवहार थांबून ३ लाख १० हजारांची रक्कम गोठवल्याने व्यावसायिकाला दिलासा मिळाला. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख तपास करत आहे.