मराठी भाषा गौरव दिनासह नाशिक ग्रंथोत्सवाचे उदघाटन

नाशिक (प्रतिनिधी): उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग जि.प., जिल्हा ग्रंथालय संघ, व सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या सहकार्याने मराठी भाषा गौरव दिन व नाशिक ग्रंथोत्सव 2024 चे आज सकाळी उदघाटन करण्यात आले. ग्रंथोत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहे.

मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, अविनाश येवले, ‘सावाना’चे कार्याध्यक्ष ॲड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, बालभवनप्रमुख सोमनाथ मुठाळ यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

खासदार भगरे म्हणाले, वाचनाची आवड निर्माण व्हावी व मराठी भाषेचा जागर होवून व्याप्ती वाढावी यासाठी दरवर्षी नाशिक येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचकांना एकाच छताखाली साहित्यकांची साहित्य, ग्रंथ आदी उपलब्ध होणार आहेत. यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे. ग्रंथोत्सवासारखे उत्सव जिल्ह्यातील विविध तालुक्यात आयोजित केल्यास वाचक मोठया प्रमाणात वाढून वाचन संस्कृती वाढविण्यास मदत होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

प्रथम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी 75 वर्ष पूर्ण झालेले ग्रंथालय व ग्रंथमित्रांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. तरुण वर्गाला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. तरुण वर्गाला वाचन संस्कृतीमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद केले व मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी:
तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून मराठीचा जागर केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790