नाशिक (प्रतिनिधी): नवीन नाशकात भरदिवसा सोन्याच्या दुकानावर चोरट्यांनी दरोडा पडल्याची घटना आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलेटवर आलेल्या तीन जणांनी नवीन नाशकातील माउली लॉन्स परिसरातील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ३०० ग्रॅम सोने लुटून नेले आहे.
दरम्यान, दरोडा घातल्यानंतर सोने बुलेटवरून चोरून घेऊन जाताना तिघे जण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरोडा टाकण्याआधी आरोपींनी रेकी केल्याचा अंदाज पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर प्रकरणाचा गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनच्या टीम तपस करत आहेत.