नाशिक: अवैधरित्या घुसखोरी करून नाशिकमध्ये वास्तव्य करणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये अवैधरित्या घुसखोरी करून राहणा-या आठ बांगलादेशी नागरीकांना एका बांधकाम साईटवरुन अटक करण्यात आली. मध्यवर्ती गुन्हेशाखेने ही कामगिरी केली. बांधकाम साईटवर हे बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून आठ संशयित बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेण्यात आले.

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण माळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामासाठी बांगलादेशी नागरिक मजूर म्हणून काम करत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुमारे चार ते पाच दिवस तपास करीत आठ जणांची धरपकड केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये सुमन कालाम गाझी (वय २७ ) अब्दुला अलीम मंडल (वय ३०) शाहीन मफिजुल मंडल (वय २३) लासेल नुरअली शंतर (वय २३) आसाद अर्शदअली मुल्ला (वय ३०) आलीम सुआनखान मंडल (वय ३२) अलअमीन आमीनुर शेख (वय २२ ) मोसीन मौफीजुल मुल्ला (वय २२) यांचा समावेश आहे. या सर्वांकडे भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करू शकले नाही. तसेच दोन इसमांकडे आधारकार्ड मिळाले.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

ताब्यात घेतलेल्या इसमांकडे अधिक चौकशी करता बांगलादेश मधील एकाने बॉर्डर पार करण्यासाठी मदत केली. यातील सुमन गाझी हा सर्वप्रथम भारतात आला. त्यानंतर त्याच्या संपर्कातून उर्वरीत आरोपी भारतात आले. ताब्यात घेतलेल्या इसमांकडे सखोल चौकशी करणेकरीता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सचिन खैरनार, वपोनि. आडगाव पो.स्टे. हे करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्य मार्गदर्शनाखाली तपास पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, किशोर देसले, बाळु बागुल यांच्यासह पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790