नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील एकमेव सुर्यमंदिर रामकुंडावरील गंगा-गोदावरी मंदिराजवळ आहे. या मंदिरात सप्तअश्वावर आरूढ असलेली भगवान श्री सूर्यनारायणाची सुबक मूर्ती असून रथसप्तमीनिमित्ताने आज (दि. ४) हे मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे.
मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक, ८ वाजता सत्यनारायण महापूजा, ९ वाजता महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचे सौरसुक्त पठण व वेदघोष, सकाळी ९.३० वाजता भगवान सुर्यनारायणाची महाआरती, सकाळी १० ते रात्री १० पर्यंत दर्शन आणि तीर्थप्रसाद आणि सायंकाळी ७.३० वाजता अनंतविजय शंखनाद पथकाकडून शंखवादन केले जाईल.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


