नाशिक (प्रतिनिधी): भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला वाचवताना कारचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली. अपघातात कार चालक ठार झाला. एकलहरे रोडवर हा अपघात घडला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस हवालदार पुंडलिक ठेपणे यांच्या तक्रारीनुसार, दुपारी १.४५ वाजता प्रमोद विश्राम राजपूत, मोनूकुमार राजपूत दोघे त्यांचे मालक शेख यांची कार (एमएच १५ डीएम, ५४८२) प्रमोद राजपूत हे एकलहरेकडून सिन्नर फाटा कडे येत होते. समोरुन भरधाव वेगात आलेल्या दुचाकी चालकाला वाचवण्यासाठी चालक प्रमोद राजपूत यांनी अर्जंट ब्रेक लावल्याने कार रस्ता सोडून बांधकाम कामासाठी लावण्यात आलेल्या पत्र्याच्या वॉल कंपाउंडला आदळून उलटली.
कारचे दरवाजे उघडून चालक प्रमोद राजपूत (वय: ४०) बाहेर फेकले गेल्याने कारखाली दाबले गेले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाले. मोनूकुमार राजपूत गंभीर जखमी झाले. दुचाकी चालक फरार झाला. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५९/२०२५)