नाशिक: बसचालकास मारहाण करणाऱ्याला शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): सहा वर्षांपूर्वी मेहेर सिग्नल येथे एका बसचालकाला कारचालक आरोपी सेफन सिकंदर सय्यद (३६, रा. सिडको) याने शिवीगाळ करत हाताच्या चापटीने मारहाण केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत महत्वाची अपडेट…

या खटल्यात न्यायाधीश जी. पी. बावस्कर यांनी त्यास सोमवारी (दि. ६) दोषी धरले. बसचालक फिर्यादी अरुण उगले (३८, रा. दोडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. तत्कालीन उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र व परिस्थितीजन्य पुरावे सादर केले.

सरकारपक्षाकडून सहायक सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी युक्तिवाद केला. बावस्कर यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीत फिर्यादी, साक्षीदार, पंच यांची साक्ष व पुराव्यांआधारे सय्यद यास सहा महिन्यांचा साधा कारावास व दोन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790