राज्यात आजपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवणार

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील वातावरण कोरडे होत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे सोमवारपासून (दि. ३०) थंडीचा कडाका वाढणार आहे. रविवारी (दि. २९) राज्याच्या अनेक शहरांतील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण झाली होती. नाशिकमध्ये नीचांकी तापमान १५.४ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या नाशिक जिल्ह्यातील सर्वेश कुशारे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

अफगाणिस्तानकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे लेह, लडाख, काश्मीर भागात हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये किमान तापमान उणे ६ ते ७ अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणामध्ये दाट धुके तयार झाले आहे. त्यामुळे आता ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

४ जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता:
३ ते ४ जानेवारी रोजी पुन्हा नवीन पश्चिमी चक्रवाताचा अंदाज असल्याने पुन्हा हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790