नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील थंडीची तीव्रता आगामी पाच ते सहा दिवस कमी होण्याची शक्यता आहे. दोन दिवस मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. आज (दि. २१ डिसेंबर २०२४) नाशिकमध्ये 12.4 सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: शेकोटीत तोल जाऊन भाजल्याने मद्यपी तरुणाचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागात किमान तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये दुपारी वातावरण अंशतः ढगाळ राहील, असाही अंदाज आहे.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशकडे वळले आहे. त्यामुळे वातावरण बऱ्याच अंशी कोरडे राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790