नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलिस ठाणे हद्दीतील आयटीआय पूल ते माऊली लॉन्स या अंदाजे १०३० मीटर लांब रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. रस्त्याचे काम १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत करण्यात येणार असल्याने तोपर्यंत या मार्गावरून जाणारी व येणारी वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे, तशी सूचना वाहतूक शाखेने जारी केली आहे.
आयटीआय पूल (लोंढे पूल) ते सिटू भवन कार्यालयपावेतो जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद असेल. त्याऐवजी आयटीआय सिग्नलकडून येणारी वाहने आय.टी.आय. पूल येथे डावीकडे वळून सरस्वतीनगर, हेगडेवार नगर, दत्तमंदिर चौक, त्रिमूर्ती चौकमार्गे इतरत्र जातील व येतील. किंवा आयटीआय सिग्नलकडून येताना आयटीआय पूल येथे डावीकडे वळून यमुना नगर शिवशक्ती चौक, त्रिमूर्ती चौकमार्गे इतरत्र जातील व येतील.
⚡ दक्षिणमुखी मंदिरापासूनही प्रवेश बंद:
👉 दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते वावरे प्लाझा वावरे नगर, माऊली लॉन्सपावेतो जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.
👉 त्याऐवजी आय.टी.आय. सिग्नल- कडून येताना आय.टी.आय. पूल येथे डावीकडे वळून सरस्वतीनगर, हेगडेवारनगर, दत्तमंदिर चौक, त्रिमूर्ती चौक कामटवाडे, माऊली लॉन्समार्गे इतरत्र जातील व येतील.
![]()


