नाशिक: सलग दोन पंचवार्षिक नाशिक मध्य मतदार संघाने आ. देवयानी फरांदे यांना आपले प्रतिनिधित्व बहाल केले. यंदाच्या निवडणुकीत त्या मताधिक्याने निवडून येतील. इतकेच नव्हे तर त्यांना मंत्रीपदी पोहचवतील. त्यांच्या रूपाने नाशिकला सक्षम मंत्री मिळेल. त्यासाठी महिला, पुरुष व युवा नवमतदारांचा प्रा. फरांदे उत्स्फूर्त पाठिंबा आहे. असा विश्वास भाजपाचे माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष संजय बागुल यांनी व्यक्त केला.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी गेल्या दहा वर्षात अभ्यासू आणि कार्यक्षम असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे. विधानसभा सदस्या म्हणून त्यांनी विधानसभेत जनसामान्यांचा आवाज बुलंद केला. मतदारसंघातील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली. सरकारचे लक्ष वेधून प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पाठपुरावा करुन अनेक कामे मार्गी लावली. मंजूर करून घेतली व कार्यवाही केली. अनेक विकासकामे करुन विधानसभा क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला. विकासकामांसाठी भरघोस निधी खेचून आणण्यासाठी त्या कायमच आग्रही असतात. आलेला निधी पूर्णपणे व योग्यप्रकारे खर्च होईल यासाठी त्या काटेकोरपणे नियोजन व कार्यवाही करतात. विकासपर्व हा त्यांचा बोलका कार्यअहवाल मतदारसंघाचे चित्र स्पष्ट करतो. तो घरोघरी पोहोचला असून त्यात दहा वर्षांतील कार्याचे पूर्णपणे प्रतिबिंब उमटलेले दिसते.
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या आधीच्या पाच व आताच्या अडीच वर्षात प्रा. फरांदे यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल वेळोवेळी समाधान व्यक्त केले. विधानसभेत केलेल्या कामांमुळे त्यांनी केवळ नाशिकमध्ये नव्हे तर राज्यभरात आदर्श निर्माण केला आहे. कार्यकौशल्य व नेतृत्वाखाली प्रा. देवयानी फरांदे यांनी आदर्श मतदारसंघ कसा असतो हे दाखवून दिले आहे.
त्यांचे शासकीय योजना राबविण्याची हातोटी, स्थानिक पातळीवर समस्या सोडविण्यासाठी अखंड परिश्रम घेण्याची क्षमता हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. ते अनुकरणीय आहेत. त्यामुळेच मतदारांचे प्रेम, आशीर्वाद व जनविश्वास त्यांनी कमावले आहेत. यंदाही मतदारसंघात त्यांची उमेदवारी आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रा. देवयानी फरांदे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.