‘ड्रग्जमुक्त नाशिक’ लढ्याच्या भितीने आ. फरांदेंविषयी तयार केला जातोय फेक नॅरेटिव्ह

नाशिक: विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर ड्रग्ज संदर्भातील काही गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती जाणून घेतल्यास यामागेही फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. फरांदे यांनी नाशिक ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिसांकडे केलेला पाठपुरावा, विधीमंडळाच्या सलग चार अधिवेशनांमध्ये अतिशय प्रखरतेने मांडलेली भूमिका यामुळे ड्रग्जमाफियांची पळता भुई थोडी झाली. त्या भितीपोटीच विरोधकांना हाताशी धरुन आता फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न फरांदेंच्या बाबतीत होत असल्याचे दिसून येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

पुणे, मुंबईनंतर नाशिकच ड्रग्जतस्करांचे माहेरघर बनू पाहत आहे. केवळ कॉलेजमधीलच नव्हे तर शाळकरी विद्यार्थीही ड्रग्जच्या आहारी जात आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्य अतिशय महत्वपूर्ण असलेल्या नाशिकची इतकी वाताहत होणे ही बाब सर्वसामान्य नाशिककरांना सहन होण्यासारखी नाही. या पार्श्वभूमीवर सलग चार अधिवेशनांमध्ये मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी ड्रग्जमुक्त नाशिकसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ठासून सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

त्या केवळ भाषणे करुन थांबल्या नाहीत तर त्यांनी ड्रग्ज पेडलर्सचे नाव, त्यांचे फोन नंबर्स, त्यासंदर्भातील पुरावे हे गृहखात्याचे अधिकाऱ्यांना दिले. या प्रकरणाची गृहखात्याच्या माध्यमातून चौकशीदेखील करण्यास सांगितली. या विषयांवर सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे विरोधी गटातील काही नेत्यांचे पोटशूळ उठले. त्यांनी प्रा. फरांदे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करीत त्यांनी ड्रग्जविरोधात आवाज उठवणे बंद करावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी फरांदे यांची बदनामीही करण्यात आली. ही मंडळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तर हाच एक फेक नरेटिव्ह सेट करण्याच्या इराद्याने प्रचार करीत आहे. इतकेच नाही तर, मुंबईतील काही नेत्यांकडूनही फरांदेंना टार्गेट करण्यात आले. यात सुषमा अंधारेंचेही नाव घेतले जाते. त्यांच्याविरोधात कायद्याप्रमाणे हक्कभंगाचा प्रस्तावही फरांदे यांनी अधिवेशनात सादर केला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790