नाशिक: फरार अवैध सावकार वैभव देवरेला पिंपरी-चिंचवडमधून अटक !

नाशिक (प्रतिनिधी): चहा व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच फरार झालेला अवैध सावकार वैभव देवरे याला शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी ७ वाजता पथकाने पिंपरी-चिंचवड येथून अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

त्याची पत्नी सोनाली देवरे, शालक निखिल पवार या दोघांना आधीच अटक केली आहे. दोघेही पोलिस कोठडीत आहेत. संशयित देवरे याच्याकडून खंडणीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुंडाविरोधी पथकाने पिंपरी-चिंचवड येथील एका अपार्टमेंटमधून सापळा रचून देवरेला अटक केली. तत्पूर्वी पोलीस पथकाने त्याच्या घरी उभ्या असलेल्या दोन कार आणि चार दुचाकी जप्त केल्या आहेत. ही वाहने कर्ज थकल्याने देवरे याने ओढून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'लोकल टू ग्लोबल'च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी

देवरेविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात लुटमार, खंडणी, मारहाण, अपहरणाचा प्रयत्न, दरोडा, अवैध सावकारीचे पाच गुन्हे आणि गंगापूर पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा सहावा गुन्हा दाखल आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790