नाशिक: भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात २६ वर्षीय तरुण चालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव दुचाकी घसरल्याने २६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात जत्रा नांदूर लिंकरोडवरील समृध्दी लॉन्स भागात झाला होता. गेल्या तीन दिवसांपासून मृतदुचाकीस्वारावर खासगी रूग्णालायात उपचार सुरू होते. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' तीन नवीन मार्गांवर सोमवारपासून सिटी लिंक बससेवा सुरु होणार

नितीन बन्सीलाल ताडगे (रा.जेवूर ता.मालेगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. नितीन ताडगे गेल्या गुरूवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोडकडून जत्रा हॉटेलच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. जत्रा नांदूर लिंकरोडवरील समृध्दी लॉन्स भागात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ रस्ता कामाला चार वर्षानंतर सुरुवात

कुटुंबियांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले होते. रविवारी उपचार सुरू असतांना डॉ. राहूल भामरे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790