LPG

नाशिक: भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी महिला ठार झाली. ही घटना त्र्यंबकरोडवरील सकाळ सर्कल भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लता बबन मोहिते (रा. पिंपळगाव बहुला ता.जि.नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. मोहिते या शुक्रवारी (दि.४) सकाळच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील सकाळ सर्कल भागातून पायी जात असतांना अज्ञात भरधाव चारचाकीने त्यांना धडक दिली होती. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयातील प्रथमोपचारानंतर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 मार्च रोजी आयोजन

प्रकृत्तीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र अपघातामुळे बुधवारी (दि.९) पुन्हा अचानक त्रास होवू लागल्याने मुलगा सागर मोहिते याने त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास बेंडकुळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790