धक्कादायक: नाशिकमध्ये ९ वर्षीय शाळकरी मुलीवर अल्पवयीन मुलाने केला बलात्कार

नाशिक (प्रतिनिधी): घराबाहेर खेळणा-या मुलीस घरात बोलावून घेत एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीने आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  व्यावसायिक सिलिंडर झाले 'इतक्या' रुपयांनी स्वस्त...

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा वर्षीय संशयित व ९ वर्षीय पीडिता एकाच भागातील रहिवासी असून शनिवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. शाळकरी मुलगी आपल्या अंगणात खेळत असतांना संशयिताने तिला आपल्या घरात बोलावले. यावेळी घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने तिच्यावर बलात्कार केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंजमाळ परिसरात अवैध देशी दारू विक्रीवर गुन्हेशाखेची कारवाई; एकास अटक

मुलीने घरी जावून कुटुंबियांजवळ आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790